Maratha Andoalan reservation protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तरुणाने बाईक (New Bike Burn) पेटवून देत सरकारचा निषेध केला आहे. हिंगोलीतल्या जवळा बाजार येथे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी परिसरातील वातावरण तापलं आहे. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वत:ची कार जाळून पोलिसांच्या लाठीचार्जचा (Maharastra Police) निषेध केला होता. त्यानंतर आता ठिकठिकणी आंदोलन होताना दिसत आहे. अशातच संपूर्ण महाराष्ट्रात  लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना (Jalana News) जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकावर झालेल्या हल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. हिंगोली जिल्ह्यात जवळाबाजार येथे भर चौकात मराठा तरुण वसमत तालुक्यातील नहाद येथील विनायक बोरगड यांनी स्वतःची दुचाकी जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर शेकडो तरुण रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केलं. मात्र दुचाकी मात्र जळून खाक झाली.


पाहा Video



जालन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. गृहमंत्रालयाने सक्तीच्या रजेचे आदेश काढले आहेत. जालन्याच्या झालेल्या प्रकरणानंतर आता त्याचे वाहतुकीवर देखील पडसाद होताना दिसत आहे. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या बससेवा ठप्प झालीये. त्यामुळे पुण्यातून संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.


आणखी वाचा - जालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजे थेट गृहमंत्र्यांना इशारा, 'खुलासा करा नाहीतर...'


दरम्यान, जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईत ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलंय. दादरमधील वीर कोतवाल चौकात 11 वाजता निषेध आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आला होता.