औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. 2 खासगी आणि 1 पोलिसांची गाडी पेटवण्यात आली आहे. अश्रृधुराच्या कांड्या देखील फोडल्या आहेत. पुण्यात देखील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. नगर सस्ता आणि चांदणी चौकात तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुण्यात जिल्हाधिकाऱ्य़ाचं कार्यालय देखील फोडण्यात आलं आहे.चांदणी चौक परिसरात पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला आहे. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाली आहे. चांदणी चौक परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागतांना दिसत आहे. नांदेडच्या उमरी रेल्वे स्थानकात देखील तोडफोड झाली आहे. नाशिकमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दुकानांवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.