आरक्षणाबाबत राज्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
मराठा आरक्षणाबाबत महत्वाची बातमी
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आजची सुनावणी संपली आहे. आज आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिंकावर सुप्रीम कोर्टात (Supereme Court) सुनावणी होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी झाली. यामध्ये सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना नोटीस देण्यात आली आहे. आरक्षण संदर्भात म्हणणे मांडण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण अनेक राज्यात गेले आहे. त्यावर कोर्टानं राज्यांना भूमिका मांडायला सांगितली आहे. पुढील सुनावणी 15 मार्च पासून सुरू होणार आहे. 15 ते 24 आशा तारखा सुनावणी घेऊया असं कोर्ट म्हणाले आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी झाली. ५ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाबाबत वेळापत्रक ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार आजपासून १० मार्चपर्यंत आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते आपली बाजू मांडतायत. राज्य सरकार आणि आरक्षण समर्थकांतर्फे १२, १५, १६ आणि १७ मार्चला युक्तिवाद होतील. तर १८ मार्चला केंद्र सरकार बाजू मांडणार आहे.