औरंगाबाद: गेली जवळपास दोन वर्षे शांततेनं सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलंय.  कायगाव नाक्यावर आंदोलकांनी पोलीसांवर हल्ला चढवला. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराचा वापर केला. पण हिंसक जमावानं घटनास्थळी दाखल झालेत. 


आमदार, खासदारांवरही जनतेचा रोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगापुरात गोदावरी नदीच्या तिरावर  काकासाहेब  शिंदे यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यविधी करण्यात आले. या अंत्याविधी साठी आलेले  शिवसेना खासदार खैरे आणि सुभाष झांबड यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. खासदार खैरे आणि सुभाष झांबड यांना यावेळी  धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळं त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.



उपराजधानीतही मराठा मोर्चाचे पडसाद


मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदची छाया उपराजधानीतही पडलीय. मराठा संघटनांकडून बंदची हाक दिल्यानंतर नागपुरात मराठा आंदोलक सकाळीच रस्त्यावर उतरले. त्यांनी महाल परिसरात रस्तारोको केला. परिसरातील दुकानेही बंद केली. राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.