Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे (LathiCharge) राज्यभरात पडसाद उमटलेत. राज्यात अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. लाठीचार्चज्या निषेधार्थ जालनातल्या  (Jalna) बदनापूरमध्ये आज मराठा समाजाच्यावतीने आंदोलन पुकारण्यत आलं होतं, त्याला हिंसक वळण लागलं. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवलीय. मराठा आंदोलकांना मारहाण केल्याने बदनापुरात कडकडीत बंद आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केलीय...यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही जाळपोळ केलीय. पोलिसांनी वातावरण निवळण्यासाठी हवेत गोळीबार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्याच्या घटनेचे पुणे, नाशिक नागपुरातही पडसाद उमटलेत.. पुणेजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली.. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. तर नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडनं आंदोलन करत सरकारचा निषेध केला.. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्नही केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.. उपराजधानी नागपुरातही जालन्याच्या घटनेचे पसाद उमटले.. महाल मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.. 


फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळली
संभाजीनगरमधल्यामधल्या फुलंब्रीत (Fulambri) गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे (Mangesh Sable) यांनी मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वी घेतलेली स्वत:ची नवी कोरी कार पेटवून निषेध व्यक्त केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत मंगेश साबळे एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देताना दिसत आहेत. आमच्या लोकांना हात लावला तर आम्ही गप्प बसणार नाही, आता स्वत:ची कार जाळली, पुढे स्वत:ला पेटवून घेऊन असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे. 


मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी मंगेश साबळे यांनी केली आहे. आमच्या समाजाच्या आई-बहिणींवर काठ्या पडत असतील, त्यांच्या डोक्यातून  रक्त निघत असेल तर सहन केलं जाणार नाही, असा इशाराही साबळे यांनी दिला. 


बीडमध्ये तोडफोड
बीड जिल्ह्यात माजलगावात कमालीचा तणाव आहे. आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आले. आंदोलनांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केलीय. हॉटेलं आणि दुकानांची आंदोलकांनी तोडफोड केलीय. तर हिंगोली जिल्ह्यातील एसटी बसची वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. परभणी परिवहन विभागाच्या हिंगोली जिल्ह्यातील तीन तर परभणी जिल्ह्यातील चार ही आगारातून बस बाहेर पडली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होतेय. 


उद्धव ठाकरेंची टीका
जालन्यातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय...जालन्यात सरकारला शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा होता...त्यामुळे कार्यक्रम घेण्यासाठी आंदोलन मोडीत काढल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय...तर कोरोना काळात चांगलं काम करणारे पोलीस तुमच्या आदेशाशिवाय असे वागूच कसे शकतात...? असा सवालदेखील उपस्थित केलाय...