नंदुरबार: खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालय जवळ झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून नंदुरबार शहर, नवापूर तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, शाळकरी मुलं शाळा बंद ठेवण्यात आल्याने घराकडे परतली आहेत. काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला. काही आंदोलकांनी गावित गाडीवर चढून हल्ला केला. दरम्यान, गावितांना गाडीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं.


...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे. डॉ. गावीत यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे आरक्षणाशिवाय कुठलाही हेतु नाही, असे स्पष्ट करतांना आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हा समन्वयक मनोज मोरे यांनी दिला आहे. कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.


माझ्या गाडीची तोडफोड ही पुर्वनियोजित- खासदार डॉ. हीना गावीत


आपल्या गाडीची झालेली तोडफोड ही पुर्व नियोजीत असल्याची शक्यता खासदार डॉ. हीना गावीत यांनी व्यक्त केली आहे. आपल्या आधी आमदार कुणाल पाटील यांना जाऊ देण्यात आले. मात्र आपली गाडी फोडण्यात आली, असं सागत साक्षात मुत्यूच आपल्याला दिसल्याचे डॉ गावीत यांनी स्पष्ट केले. कोणालाही आरक्षण द्यायला आपण विरोध केला नसुन अशी तोडफोड योग्य नसल्याचे डॉ. गावीत यांनी स्पष्ट केले आहे.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडलाय.  खासदार हिना गावित या नियोजन मंडळाची बैठक संपवून नंदुरबारकडे रवाना होत असातंना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी हा हल्ला केला.