रत्नागिरी : मराठा आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग हातखंबा इथे रोखून धरला होता. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीतील ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर शहरातून काढलेल्या मोर्चानंतर आंदोलकानी मुंबई गोवा माहामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


दरम्यान, मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधिर सावरकर यांच्या रामनगरातील घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 


अकोल्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्हा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चानं त्यांचा रोख जिल्ह्यातील मराठा समाजाचे खासदार, आमदारांकडे वळवलाय. समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यासाठी क्रांती मोर्चा आग्रही आहे.