जरांगेंचा सर्वांसमोर तमाशा, फडणवीसांवर अभद्र टीका- बारस्करांचा हल्लाबोल
Ajay Baraskar On Manoj Jarange: लोणावळा, वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली, असा आरोप बारस्कर यांनी केलाय.
Maratha Reservation: अजस बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर अभद्र भाषेत टीका केलीय. तसेच उपोषण काळात दूध भाकर खाल्ली. वाशीमध्ये त्यांनी पारदर्शकतेचा भंग केल्याचे ते म्हणाले. माझ्यावर पाटील यांनी आरोप केलेत. याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी पण त्यांनी ती मागितली नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर किंवा खंडन केलं नाही. लोणावळा, वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली. याउलट मला धमक्या शिव्या आणि जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले. मी सत्य मांडतोय. म्हणून माझ्या भूमिकेशी समाज सकारात्मक आहे. वारंवार मी आक्षेप घेतले आणि प्रश्न विचारले याचे उत्तर द्या, असे ते म्हणाले.
कालचा तमाशा सर्वांसमोर
मनोज जरांगेंचा कालचा तमाशा सर्वांसमोर आला. नेतृत्व कसं नसावं काल दिसलं. माझ्याकडून आडमुठपणा झाला काल कबूल केलं. हेकेखोरपणा आणि आताताईपणा करतात हेच मी सांगितलं.कोटीची लोकं काल दोनशेवर आलीकालच्या भूमिकेमुळे सगळे नेते तुमच्यावर टीका करत आहेत. कालच्या भूमिकेमुळे समाजाची छी तू झाली
माझा फोटो काल ट्रोल केला गेला. त्या फोटोत पुण्याची मंडळी आहेत. आम्ही आरक्षण मागण्यासाठी भेट घेतली होती. आरक्षण मारुतीच्या मंदिरात मिळत नाही. मी टिकेला अजिबात उत्तर देत नाहीत. पण या बाबने इतके नाटक केले आहे. दोन माणसं आमची लोकं चार दिवसापूर्वी धरत होते मात्र काल पंधरा माणसांना ऐकत न्हवते. मराठा समाजाने आता जाग व्हायला हवं.
माझी नार्को टेस्ट करा
माझ्यावर बलात्कार, पैसे घेतल्याचे आरोप करण्यात आले. याप्रकरणी माझी नार्को टेस्ट करा, चौकशी करा असे मी जाहीरपण सांगतोय. मी अत्याचार केले असतील तर त्या माय माउलीला पुढे आणा. आरोपांमुळे माझ्यावर आणि घरच्यांवर आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आणली
मनोज जरांगे काल अभद्र भाषेत फडणवीस यांच्यावर बोलले. त्यांचा पुरोगामी बुरखा काल फाटला. आम्ही तुमच्याकडे कशाला आलो होतो ते सांगा.
वाळेकर पाटिल यांनी काल पत्रकार परिषद घेत परिस्थिती मांडली वाळेकर यांच्या डोळ्यात काल अश्रू होते. पाटील यांची अनेक भाषण बघा. यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या. हा म्हणायचा नदीत जीव देईन यांनी नाही दिला मात्र समाज बांधवानी दिला.हा द्वेष पसरवतो त्यामुळे मराठा बांधव बरबाद झाला. समाजच याच्यामुळे नुकसान झालं. कोणत्यातरी नेत्याचा सांगण्यावरून जरांगे पाटलांनी हे सांगितलं का? 'जाणत्या राजा'ने सांगितलं का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
जरांगेनी उपोषण काळात दूध भाकर खाल्ली. राजेश टोपे साहेबांचे फोटो तुमच्यासोबत दिसले. राजेश टोपे स्वतः आले होते त्यांनी दगडफेक करायला सांगितले असे वाळेकर स्वतः सांगतात ते खरं आहे.
फडणवीसांशी काही संबंध नाही
माझा भाजप आणि फडणवीसांसोबत काही संबंध नाही. त्यांच्यावर पण मी टीका करतो. तुमच्या आंदोलनातून गावागावातून भांडण होत आहेत. तुमचं नक्की उद्दिष्ट काय? माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असं तुमचं म्हणणं आहे.
तर वाळेकरवर 307 गुन्हा दाखल आहे
माझ्या घरच्यांनी मला संयमानी बोलायला सांगितलंय. त्यामुळे मी अजून गौप्यस्फोट नाही करत. पोलिसांनी लाठीचार्ज का केला? ते माहिती नाही. नंतर सगळं झालं. मी तेव्हा अतंरवालीत न्हवतो. समाजाने मला विनंती केल्यामुळे मी जास्त बोलत नाही.
कुणबी नोंदी आहेत त्यानुसार आम्हाला आरक्षण द्या ही आमची मागणी आणि भूमिका आहे. कार्यकमाचा खर्च कुठून येत होता, ते त्यांनी मला सांगावं, असे ते म्हणाले.
पाटील यांचे समर्थक आले म्हणून मी खबरदारी घेतली आणि पोलिसांना कळवलं. त्यातला एक पदाधिकारी नवी मुंबई राष्ट्रवादीचा होता. भुजबळ यांना माझा अजूनही विरोध आहे. फडणवीस चुकले तेव्हा चुकले असं म्हटलं
पाटील आरक्षणवर बोलले नाहीत. भुजबळ वर बोलले.. नंतर शिंदे साहेब फडणवीस साहेब बोलत राहिले... काल तर वेगळीच भाषा होती. बागेश्वर बाबांनी वक्तव्य केलं तेव्हाही मी बोललोच होतो. माझा आणि देहूचा काही संबंध नसल्याचे ते म्हणाले.
आंदोलनाला सराटीमध्ये टर्निंग पॉईंट
मी कधी मरेन सांगता येत नाही. माझी देहू संस्थांना विनंती आहे त्यांचा गाडीत जे महाराज बसले होते,त्यांनी तुकोबा यांचं अभंग बदलला त्यावर का बोलत नाही? सरकार ने सांगितलं म्हणजे करत असं नाही. सरकारच्या चुका आहेत. सरकारने अधिसूचना अंमलबजावणी करा यासाठी आम्ही कायदेशीर भूमिका घेणार आहोत. त्यांचा आंदोलनाला सराटीमध्ये टर्निंग पॉईंट्स मिळाले. तिथे कोणी असता नेता झाला असता. लाठीचार्ज झाला आणि मग सगळं घडलं. जी वस्तू जितक्या लवकरवर जाते तितक्यावर पटकन खाली येते, असेही ते पुढे म्हणाले.