Maratha Reservation | अशोक चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : विनायक मेटे
आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे.
बीड : आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसंग्रामचे नेत विनायक मेट यांनी संतप्त प्रतिक्रिया देत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकाने पारीत केलेला मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर वेळोवेळी सुनावनी घेण्यात आली . परंतु आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले ते व्यर्थ ठरले आहे. मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण यांची होती. त्यांनी याबाबत गांभीर्य़ाने लक्ष दिले नाही. अशोक चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.