Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडल्याने मनोज जरांगेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरासह उमरद फाटा येथे सभा घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मनाई आदेश जारी केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रॅली काढण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. तरीही मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली आणि रॅली काढली होती. त्यामुळे मनोज जरांगेंवर कारवाई करण्यात आली.


मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या यामध्ये बीड शहरातील नाळवंडी नाका भागात तसेच बीड तालुक्यातील उंमरद फाटा येथे सभा पार पडली. यादरम्यान विनापरवानगी सभा आयोजन, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच जेसीबीचा असुरक्षित रित्या वापर या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्यासह दीडशे ते दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह इतर 150 तर पिंपळनेर पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान यापूर्वी देखील बीडच्य अमळनेर आणि शिरूर पोलीस ठाण्यात मनोज जारंगे पाटील यांच्यावर रास्ता रोको प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


नांदेडमध्येही गुन्हा दाखल


दरम्यान, गेल्या दहा दिवसांत जरांगे यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगेंवर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी रात्रीदेखील  मनोज जरांगे यांच्याविरोधात नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मनोज जरांगे यांची नांदेडमध्ये रात्री 11.30 वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यलयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकली परवानगी देण्यात आली नव्हती. दुसरीकडे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 5 तारखेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. तसेच आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती. असं असूनही बैठक घेतल्याने मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.