Chhagan Bhujbal On Manoj Jarange: विधानभवन मराठा आरक्षण विधायक मंजूर करण्यात आले. विधानभवनाबाहेर जल्लोष करण्यात येत आहे. फटाके आणि ढोल ताशे वाजविण्यात येत आहे. दरम्यान ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडले. त्यानंतर सभागृहात ते एकमताने संमत झाले. यावेळी छगन भुजबळ बोलण्याची मागणी करत होते. पण विधेयक आवाजी मतदाने मंजूर करण्यात आले. यावेळी विधानभवनात नेमके काय झाले? भुजबळ काय म्हणाले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी बोलयला देण्याची मागणी केली. भुजबळांनी माईकचा बटण दाबून ठेवलं होतं. शेजारी बसलेल्या विखे पाटलांनी माईक बंद केला. पण भुजबळांनी परत माईक सुरू केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र 'बोलू नका'असा इशारा भुजबळांना केला. 


पण भुजबळ अखेर माईक सुरु करुन बोललेच. ज्या जरांगे उल्लेख सीएम करतात ते धमक्या देतात. शिव्या देतात. मला धमक्या दिल्या, असे भुजबळ म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याखाली बसून ते मुख्यमंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांना शिव्या देतात. जरांगेंची दादागिरी सुरू असून ती थांबवणार की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. भीतीचे वातावरण मुद्दाम केले जात असल्याचे ते म्हणाले.


माझे आंदोलन संपणार नाही असे ते सांगतात. याचा अर्थ उपोषण थांबवणार नाही. दादागिरी थांबवणार नाही हे दिसून येते, असेही भुजबळ म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळांना उत्तर दिले.  तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. यावर  शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असे म्हणत सभागृहाचे कामकाज संपले असे विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले. 


'दहा हजारच्या 2 माळा लावा, असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत'


असे असले तरी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वड्डेटीवार यांचा विरोध कायम आहे. हे विधेयक निवडणुकीच्या तोंडावर आणून फसगत करण्याचा प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.