Manoj Jarange on Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसंच ज्यावेळी मी सांगेन तेव्हा अर्ज मागे घ्यायचा असंही त्यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला. राज्यात 36 मतदारसंघात फक्त मराठ्यांच्या मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतात. ज्यांनी मराठ्यांना संपवलं त्यांना संपवण्यासाठी लढावं लागेल. मात्र समीकरण न जुळल्यास अर्ज मागे घ्यावा लागेल असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. जिथे आपला उमेदवार नाही तेथील उमेदवाराकडून आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं बाँडवर लिहून घ्या असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. 


जिथे निवडून येईल तिथे उभा करू. SC, ST चा आपल्या विचारांचा उमेदवार निवडून देऊ. आपल्या मागण्या मान्य असल्याचं जो उमेदवार स्टॅम्पवर आपल्याला लिहून देईल त्याला पाठिंबा देऊ. कोणत्या मतदारसंघात उभं करायचं हे मी दोन ते तीन दिवसात मतदा संघ सांगतो. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. एका मतदारसंघात दोघा तिघांनी अर्ज भरा. मग आपण बघू की कोण निवडून येऊ शकतो. ज्यावेळी मी सांगेन की अर्ज मागे घ्यायचा. आपण चौफेर वार करायचा आहे. यांची चिरफाड अशी करावी लागणार आहे. अर्ज काढून घे म्हटलं तर नाराज व्हायचं नाही. ज्यांनी मराठ्यांना संपलं त्यांना संपवायचंच गप्प बसायचं नाही. आता तुम्ही फॉर्म भरून या तुमचे पैसे बुडणार नाहीत काढून घे म्हटलं की तुमचे पैसे वापस येतील. नंतर आपण मेरीट नुसार ठरवू, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.