Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरूवात केलं होतं. मात्र, नवव्या दिवशी कोर्टानं उपचार घेण्याचे आदेश दिल्यामुळे जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. गावातील महिला आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी पाणी पित उपोषण सोडलं. 'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो' असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. जर आरक्षण दिलं नाही, सगळ्या मागण्या मंजूर नाही केल्या तर माझ्या नावाने बोंबलत बसायचं नाही आणि मला विचारायचं नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे ही झाली हे मला विचारयचं नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाने स्वत:च्या पोरांना धोका देऊ नका राजकीय लोकांसाठी. स्वत:च्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांना एकजीवाने राहा, नेत्याला, नेत्याच्या पोराला मोठं करण्यासाठी मतदान वाया घालवू नका असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. रोज पाऊस सुरू आहे, आजही पाऊस सुरु आहे. लोकांना त्रास होत आहे. रोज हजारो लोक येतात चिखलात उभे राहतात याचं वाईट वाटत, ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या म्हणून आंदोलन केलं. मराठा कुणबी एकच आहे त्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांना तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. तुमच्या हातानें तुमची सत्ता पाडू नका, हे शहाणपणाने सांगतो, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.


काल रडलेला आवाज कानावर आल्यानांनंतर कधीच उपोषण करायचं नाही, असं वाटत होतं. मी स्वतःसाठी नाही,समाजासाठी उपोषण करतो. हे लोक कधीच मराठ्यांच्या लेकरांना मोठे करणार नाहीत,मराठ्यांना एकत्र येऊनच त्यांचे लेकरं मोठे करावे लागतील प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतोय. सत्तेतील मराठ्यांना देखील आरक्षण नसल्यानं वाईट वाटत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.


फडणवीस साहेब, मराठा आरक्षणाची वाट बघतोय, तुम्हाला संधी आहे संधी वाया जाऊ देऊ नका राख रांगोळी होऊ देऊ नका, जर ही संधी सोडली तर तुमचा सगळा हिशोब करीन असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांनी शांत राहावे नाही दिल तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेऊ असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. रात्री जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक मला भेटायला आले होते कोर्टाने सांगितलं की मी उपचार घ्यावेत म्हणून कोर्टाचा सन्मान म्हणून उपचार घेतलेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.