सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद, जालना आणि सोलापूरमध्ये आंदोलनं करण्यात आली. औरंगाबादमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून आज पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी परतूरमध्ये सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा  मोर्चाच्या वतीने सोलापूर शहरातील शिवाजी चौकात चक्का जाम केलं.  तर अमरावतीत आरक्षणासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथे सुरुवात झाली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  दरम्यान, औरंगाबादमधील धरणे आंदोलन बेमुदत करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. यामुळे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू औरंगाबाद होण्याची शक्यता आहे.