छगन भुजबळांकडून मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंची पाठराखण
मराठा आरक्षणासाठी आज नाशिकमध्ये मूक आंदोलन, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
मुंबई: मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात नाशिकमध्ये मराठा मूक आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाला पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्याक्ष नरहरी झिरवळ, सदाभाऊ खोत उपस्थित होते.
कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. आपण कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 'मराठा समजला आरक्षणाला मिळालं पाहिजे यात दुमत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी माझ्या पक्षाच देखील भूमिका आहे. छत्रपती, शाहू,महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संभाजी महाराज हे नेतृत्व करत आहेत याचा मला अभिमान आहे.'
'मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संभाजीराजे अतिशय चांगला काम करत आहेत म्हणत छगन भुजबळांनी संभाजीराजेंचं कौतुक केलं आहे. संभाजी महाराज सगळ्यांना सोबत घेऊन जायची भूमिका घेतली या बद्दल त्यांचे अभिनंदन करतो.'
'एकमेकांसोबत आपल्याला भांड्याचे नाही सोबत काम करायचे आहे. माझा कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. मी मराठा समाजाच्या विरोधात आहे असं काही लोक कायम गैसमज पसरवत आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी काही अडचणी आहेत मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले तर OBC समाजाचं आरक्षण रद्द केलं. असंही यावेळी छगन भुजबळ म्हणाले आहेत.