Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या तीव्र आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. यातील हल्ला, जाळपोळ असे गंभीर स्वरुपाते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी अचानक मराठा आंदोलकांचे जुने गुन्हे काढून हद्द पारीची कार्यवाही करणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड येथील मराठा महिला कार्यकर्त्या सरोज देशमुख यांना नोटीस धाडण्यात आली आहे. यवतमाळ,वाशीम आणि नांदेड जिल्ह्यातून त्यांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात येत असल्याचे  नोटीशीत म्हटलंय. उमरखेड एसडीओ यांनी  मराठा महिला कार्यकर्त्या सरोज देशमुख ही नोटीस पाठीवली आहे. 


कोण आहेत सरोजनी देशमुख?


प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावयचा अशी संकल्पना मनोज जरांगेनी मांडली होती. या संकल्पनेतील इच्छूक उमेदवारांपैकी सरोजनी देशमुख या एक होत्या. त्यांच्यावर 353 सह विविध चार गुन्हे दाखल आहेत. निवडणूक काळात त्या शांतता सुव्यवस्थेचा भंग करून दंगल घडवतील असा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आलाय. हेतुपुरस्सर सरोजनी देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईचा हिंगोली येथील सकल मराठा समाजाने निषेध केलाय.


'सगेसोयरेला विरोध करणाऱ्याला पाडा'


मराठा समाजाकडून निवडणुकीला उमेदवार उभा करता येऊ शकतो का? याची चाचपणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यांनी मराठा समाजातील नागरिकांचे मत यावर विचारले. त्यानुसार आपण निवडणूक लढवणार नाही किंवा अपक्ष मराठा उमेदवारही उभे करणार नसल्याचे मनोज जरांगेंनी जाहीर केले. तुम्हाला ज्याला मत द्यायचंय त्याला मत द्या. सगेसोयरे निर्णयाला विरोध करणाऱ्याला पाडा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राजकारणात गेल्याने आरक्षण विषय मागे राहतोय, असे मत काहींनी व्यक्त केलंय. आपले उमेदवार उभे न करता आपल्या मताची शक्ती दाखवा. वेळ अपुरा पडल्याचे मत काहींनी व्यक्त केले. ही सर्व मते जरांगेंनी वाचून दाखवली. त्यांच्या डावाला प्रतिडाव मला टाकायचाय. पण तुम्ही तिथपर्यंत जायलाच तयार नाही, तर मी काय करणार? असा प्रश्न त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना विचारला. अपक्ष उमेदवार दिला तर अमुक तमूक जिंकून येईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्यावर जरांगे संतापले. आरक्षण पाहिजे तुम्हाला. गरीब मुलं तुमची. तुम्हाला नेता पाहिजे. नेता-पक्ष सोडायचा नाही मग तुम्ही मोठे कसे होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. लढलो तर तुमची ताकद दिसेल, असे ते म्हणाले. 


लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगेंची मोठी घोषणा