हिंसेशी आमचा संबंध नाही- मराठा समन्वय समिती
हिंसा करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही असे यावेळी समन्वयकांनी सांगितले.
पुणे : आंदोलनात बाह्य शक्ती शिरल्या आहेत, त्या हिंसा करत असल्याचे मराठा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. काल झालेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. हिंसक घटनेचा आम्ही निषेध करतो आणि हिंसा करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही असे यावेळी समन्वयकांनी सांगितले. काल झालेल्या बंदलाऔरंगाबाद, पुणे अशा ठिकाणी हिंसक वळण लागले. यामुळे सरकारची मालमत्तेला हानी पोहोचली असून कोट्यावधींचे नुकसान झाले. या नुकसानाला कोण जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत होता. मराठा समन्वय समितीने हिंसेची जबाबदारी झटकल्याचे स्पष्ट झालंय.
यापुढे साखळी उपोषण
यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण करण्यात येईल अशी घोषणाही समितीच्यावतीने करण्यात आली. तोडफोड करणारे मराठा आंदोलक नसून मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. १५ ऑगस्टपासून आम्ही चूलबंद करु असेही त्यांनी सांगितले.