Nana Patekar on Vikram Gokhale : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन (Vikram Gokhale Passed Away) झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम गोखलेंची तब्येत बरी नव्हती. पुण्यातील (Pune Deenanath Mangeshkar Hospital) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखलेंच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (marathi Actor Nana Patekar facebook post on vikram gokhale death latets marathi news) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. गोखलेंचे मित्र अभिनेते नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये, विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो... असेन... तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. 


विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा नटसम्राट चित्रपटातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये नाना पाटेकरांच्या जिगरी मित्राची भूमिका साकारली होती. दोघा मित्रांची जोडी प्रेक्षकांच्या कायम मनात राहणारी आहे. 



विक्रम गोखलेंनी मराठीतच नाहीतर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 1971 मध्ये त्यांनी 'परवाना' चित्रपटात काम केलं होतं.