पुणे : विसर्जन मिरवणुकीत मराठी सिने क्षेत्रातले जवळपास सत्तर कलाकार सहभागी झालेत. या कलाकारांनी ढोलपथकातल्या ढोल पथकावर थाप देत मिरवणुकीत रंगत आणली होती.


पुण्याचे मानाचे गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा गणपतीला विसर्जनासाठी मंडपातून चांदीच्या पालखीत बसवण्यात आलं. ही पालखी टिळक चौकात येऊन तिथून मिरवणूकीला सुरुवात झालीय. त्यानंतर एकपाठोपाठ एक मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली आहे. प्रत्येक गणपतीसमोर पारंपरिक पद्धतीनं ढोलताशांचा गजर सुरू आहे.