Marathi Bhasha Din 2023 : महाराष्ट्राची अस्मिता जपत आणि गेल्या शतकांपासून प्रत्येकाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या आपल्याला ओळख देणाऱ्या मराठी भाषेचा गौरव दिन म्हणजे प्रत्येकासाठीच अभिमानाचा क्षण. आदरणीय, कविवर्य कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण राज्यासाठी (Marathi bhasha gaurav din) मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा म्हणजे अनेकांसाठीच कुतूहलाचा दिवस. ही भाषा तुम्ही कशी वापरता त्यातूनच तिचं सौंदर्य क्षणोक्षणी खुलत जातं. अशा या भाषेतील अनेक शब्द म्हणजे दिग्गजांचं देणं आहे, हे तुम्हाला माहितीये का? 
 
खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांनीच या (Marathi language) मराठी भाषेमध्ये मोलाचं योगदान देत काही असे शब्द आपणा सर्वांनाच दिले जे आपण, दैनंदिन बोलीभाषेत सातत्यानं वापरतो. अगदी पगाराशी संबंधीत असणारा वेतन हा शब्दही त्यांनीच दिला. माहित नव्हतं ना तुम्हाला? सावरकरांनी दिलेले हे शब्द तुम्हीही एकदा पाहाच... 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेत दिलेले काही महत्त्वाचे शब्द... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनांक (तारीख), क्रमांक (नंबर), बोलपट (टॉकी), नेपथ्य, वेशभूषा (कॉश्च्युम), दिग्दर्शक (डायरेक्टर), चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इन्टर्व्हल), उपस्थित (हजर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापालिका (कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), पर्यवेक्षक ( सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य/त्वरित (अर्जंट), गणसंख्या (कोरम), स्तंभ ( कॉलम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), हुतात्मा (शहीद), निर्बंध (कायदा), शिरगणती ( खानेसुमारी), विशेषांक (खास अंक), सार्वमत (प्लेबिसाइट), झरणी (फाऊन्टनपेन), नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर), विधिमंडळ ( असेम्ब्ली), अर्थसंकल्प (बजेट), क्रीडांगण (ग्राउंड), प्राचार्य (प्रिन्सिपल), मुख्याध्यापक (प्रिन्सिपल), प्राध्यापक (प्रोफेसर), परीक्षक (एक्झामिनर), शस्त्रसंधी (सिसफायर), टपाल (पोस्ट), तारण (मॉर्गेज), संचलन (परेड), गतिमान, नेतृत्व (लिडरशीप), सेवानिवृत्त (रिटायर), वेतन (पगार)


हेसुद्धा वाचा : Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?


 


हे आणि असे शेकडो शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. बरं, हे करत असताना दुसऱ्या भाषांबद्दल कधीच त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण, फक्त कोणतीही भाषा शुद्धच असावी, असाच त्यांचा सूर. ज्यासाठी आग्रहीसुद्धा होते. म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान अतुलनीय आहे.