मुंबई : आज 'मराठी भाषा दिन', राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.  २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्ञानपीठ विजेते लेखक वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण म्हणून हा मराठी भाषा दिन साजरा केला जातो. १९८७ मध्ये कुसुमाग्रजांचा प्रतिष्ठेच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला. तेव्हापासून सरकारने हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून घोषित केला. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  


आता शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी बातमी आली आहे. राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय लवकरच सक्तीचा होणार आहे. मराठी भाषा सक्ती करण्याबाबतचं विधेयक विधानपरिषदत एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. आता हे विधेयक विधानसभेत मांडलं जाणार आहे.. दरम्यान आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नमूद केलं आहे. (ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा) 


 



राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या शाळाप्रमुखांना एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार आहे.