HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका कंपनीच्या HR नं लिंक्डइनवर केलेल्या एका पोस्टमुळे वाद सुरु झाला आहे. ही HR गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. ती सध्या मुंबईतील एका कंपनीसाठी असलेल्या एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवारच्या शोधात आहे. पण हे सगळं सांगत असताना तिनं अशी एक गोष्ट सांगितली आहे. ज्यानं सगळ्यांना धक्का बसला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं असं काय झालं चला जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या HR नं उमेदवाराच्या शोधात असल्याचं सांगत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्या HR नं सांगितलं की मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. कमीत कमी 1 वर्ष किंवा त्याहून जास्त असा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला कोणत्या कोणत्या गोष्टी या उमेदवाराकडून अपेक्षित आहे हे सांगितलं. सगळ्यात आधी असलेली अट ही होती की मराठी माणसाला इथे अर्ज करण्यास परवानगी नाही किंवा मराठी माणूस इथे अर्ज करु शकत नाही. 



महाराष्ट्रात नोकरीची संधी आहे आणि इतकं असून जेव्हा कोणत्या कंपनीच्या HR कडून अशी मागणी येते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. हे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आधीचं ट्विटर म्हणजे आताच्या X अकाऊंटवरून नेटकऱ्यांनी त्या HR च्या त्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. एका नेटकऱ्यानं भेदभाव सुरु असल्याचं म्हटलं. त्यानंतर इतर नेटकऱ्यांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.  हे पाहता काही काळानंतर ती पोस्ट सोशल मीडियावर डिलीट करण्यात आली. 


HR नं तिच्या प्रोफाइलवरून ही पोस्ट काढून टाकल्यानंतरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणं थांबवलं नाही. त्यांनी पुढे हे स्क्रिन शॉट शेअर करत तिच्या विरोधात तक्रार करा असं म्हटलं आहे.



HR नं मागितली माफी


यासगळ्या प्रकरणातं गांभीर्य समजताच त्या HR नं एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी उमेदवार शोधत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये असलेल्या फक्त एका वाक्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मी अशाप्रकारे कोणाविरुद्धही कोणत्याही भेदभावाचं समर्थन करत नाही. माझ्या नजर चुकीमुळे मी ती पोस्ट इथे केली होती.