बेळगाव : बेळगावसह इतर मराठी भाषिक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ आज बेळगावसह सिमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात येत आहे. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषक भाग आणि 814 गावे कर्नाटकात सामील करण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरात 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. आजही बेळगावमधे काळा दिन पाळून सायकल ऱॅली काढण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कर्नाटक सरकारने नेहमी प्रमाणे या ऱॅलीला परवानगी लवकर दिली नाही. पण शेवटच्या टप्प्यात जाचक अटी आणि शर्तीवर महाराष्ट्र एकीकरण समितीला परवानगी दिली जाते हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे.