औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना पोलिसांनी अटक केलीय. डॉक्टर ईश्वर मंझा यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय.


डॉ. मंझांनी सहा लाख रुपयांच्या बदल्यात नोकरीत लावून देण्याचं आमिष दाखवल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.