मराठवाड्याची पाणीप्रतीक्षा आणखी लांबली
नियोजन अपूर्ण असल्याचं कारण देत आजचा पाणी विसर्ग रद्द करण्यात आला आहे.
नाशिक : मराठवाड्याला त्यांची पाण्याची तहान भागण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण जायकवाडीसाठी नाशिकमधून आज नियोजित असलेला पाणी विसर्ग पुढे ढकलण्यात आला आहे. नियोजन अपूर्ण असल्याचं कारण देत आजचा पाणी विसर्ग रद्द करण्यात आलायं.
पोलीस बंदोबस्त
विसर्ग करताना, नदीकाठच्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करणं आणि नदीकाठच्या गावांनी पाणी उपसू नये यासाठी, वीज बंद ठेवण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्या सकाळी याबाबत निर्णय होणार का ? याबाबत प्रश्नचिन्हच आहे.