मराठवाड्यातील पाणीसाठा खालावला; पाणीटंचाईचे संकेत
औरंगाबाद: एप्रिल महिन्य़ातच मराठवाड्यातील पाणीसाठा खालावत चालला आहे. मराठवाड्यातील प्रमुख धऱणं असलेल्या जायकवाडी धरणात 45 टक्के इतका पाणीसाठा उरलाय.. यावेळी धऱण १०० टक्के भरलं असल्यानं शेतीसाठी सुद्दा आवर्तनं देण्यात आली आहेत.. जायकवाडी धऱणातून जिथं जिथं पाणीपुरवठा होतो.. तिथं तरी यावर्षी अडचण येणार नाही, मात्र इतर ठिकाणी पाण्याची अडचण कायम आहे, संपुर्ण मराठवाड्याचा विचार करता आता मराठवाड्यातील ८६७ प्रकल्पात सध्या फक्त २२.९१ टक्के इतकाच पाणीसाठा उरला आहे.. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २६५ गावांना ३२४ टँकरनं पाणीपुरवठा सुरु आहे... त्यामुळं मे महिन्यात पाणी टंचाई नागरिकांचे हाल करणार असं चित्र दिसतेय़..