Mard Doctors Strike : राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी  (Resident Doctors Strike) आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय. (Mard Doctors strike in Maharashtra) त्यामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.  मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरातील 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे.


शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निम्मी ऑपरेशन्स पुढे ढकलावी लागली. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु होती. मार्डचे आंदोलन लांबल्यास रुग्णसेवा अधिकच कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा चार दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, त्यामुळे मार्डने कामबंद आंदोलन सुरु केले आहे. 


संपावर तोडगा नाहीच, आंदोलन सुरुच 



राज्यासह पालिकेच्या मोठ्या रुग्णालयात काल दिवसभर आंदोलन सुरु असताना प्रशासनाने चर्चेसाठी बोलावलं नसल्यामुळे हे आंदोलन सुरूच राहील असं मार्डने म्हटले आहे. मार्ड डॉक्टर आंदोलन वेगवेगळ्या मागणीसाठी राज्यातील मार्डच्या डॉक्टर यांनी संप पुकारला गेला आहे कालपासून या संपला सुरुवात झाले आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. मात्र, तोडगा काही निघालेला नाही, त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. 


सध्या साथीच्या आजराची साथ राज्यात सुरु आहेत. त्यामुळे संप मागे घेण्यात यावी अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र तरी देखील डॉक्टर संप मागे घेण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे रुग्णाना उपचार घेण्यासाठी त्रास होताना दिसून येत आहे.


महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) सांगितले की, वसतिगृहाच्या सुविधा वाढवण्यासाठी सरकारकडे अनेकवेळा विनंती केल्याने संपाची हाक द्यावी लागली. संप हा आमच्यासाठी शेवटचा उपाय आहे, तरीही, आम्हाला आशा आहे की रुग्णांना त्रास होऊ नये. रहिवासी वसतिगृहाच्या चांगल्या सुविधांची देण्याची मागणी आहे. परंतु या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मुंबईत सायन, केईएम, बीवायएल नायर, आरएन कूपर आणि सरकारी जेजे रुग्णालयातील जवळपास 4000 निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत.