अॅम्ब्युलन्समध्येच पार पडला `हा` अनोखा विवाह सोहळा
मुंबई : मेडिकल इर्मजन्सी असल्यानं चक्क अँम्ब्युलन्समध्येच पार पडला हा आगळ्यावेगळा विवाह सोहळा. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात राहणारा गणेश आणि पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावची वैशाली यांचा विवाह ठरला होता. मात्र लग्नाच्या तीन दिवस आधीच वधू वैशाली हिची तब्येत बिघडली. तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी तिचा विवाह होता. नवरदेवाकडची वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात दाखल झाली. पण वधू रुग्णालयातच असल्यानं काय करायचं? असा पेच निर्माण झाला. शेवटी ठरलेल्या मुहूर्तावरच गणेश आणि वैशालीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. त्यासाठी वैशालीला रुग्णवाहिकेतूनच सलाईन लावून मंडपात आणण्यात आलं. अखेर ठरल्या मुहूर्तावर रुग्णवाहिकेतच हा विवाह सोहळा पार पडला आहे.
या लग्नाची होतेय चर्चा
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील गणेश हा युवक व पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील वैशाली यांचा विवाह ठरला. दोन्ही पक्षांची तयारी पूर्ण झाली. मात्र, लग्नाच्या तीन दिवस अगोदर वधू वैशालीची तब्येत अचानक बिघडली. आता काय करावे? असा प्रश्न दोन्ही पक्षाकडील लोकांना पडला. मग काय नवरीला चक्क रुग्णवाहिकेतून लग्नमंडपात आणले आणि वऱ्हाड्यांच्या साक्षीने शुभमंगल पार पडला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना चिंतलधाबा येथे घडली.
वढोली येथील गणेशचा विवाह पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील वैशाली हिच्याशी ठरला होता. दोन्ही परिवारात लगीनघाई सुरू असाताना लग्नाच्या तीन दिवस अगोदर अचानक वैशालीची तब्येत बिघडली. तिला चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. बुधवारी (ता.9) विवाह पार पडणार होता. नवरदेवाकडील वऱ्हाडी चिंतलधाब्याला पोहोचले, मात्र वधू अद्याप रुग्णालयातच होती. सोहळ्याची तयारी पूर्ण असताना आता करायचे काय? असा पेचप्रसंग दोन्ही पक्षांसमोर निर्माण झाला. अशा स्थितीत वैशालीला रुग्णवाहिकेतून सलाईन लावून मंडपात आणण्याचे ठरले. त्यानंतर रुग्णवाहिका विवाह स्थळी दाखल झाली आणि वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत शुभमंगल पार पडले.
ग्रामीण भागात अगदी थोड्या थोड्या कारणाने विवाहात मानापमानाचे प्रसंग घडतात. मात्र आत्राम आणि सोयाम कुटुंबीयांनी आला प्रसंग सामंजस्याने निभावून नेत अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे.