जळगाव : वीर जवान यश देशमुख (Martyr Yash Deshmukh )यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला जळगावकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अवघे २१ वर्षीय यश देशमुख यांनी श्रीनगरमध्ये २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. जळगावमधल्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथले यश देशमुख रहिवासी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ते जून २०१९ मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते. प्रशिक्षणानंतर त्यांची पहिलीच पोस्टिंग श्रीनगरमध्ये झाली होती. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.



अवघ्या २१ व्या वर्षी यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाल्याने पूर्ण गाव शोकमग्न असून पिंपळगाव गावाजवळ असलेल्या मोकळ्या माळरानावर हा अंत्यविधी करण्यात आलेत. शहीद जवान यश देशमुख यांच्यावर आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अखेरचा निरोप देण्यात आला आहे.



यावेळी उपस्थित ग्रामस्थांना अमर रहे, अशा घोषणा दिला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले आहेत. जड अंत:करणाने यश देशमुख यांना मुखाग्नी देण्यात आला आहे. पिंपळगाव येथे हजारो नागरिकांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.