नांदेड : कॉपी मुक्ती अभियानाचा नांदेडमध्येही फज्जा उडाल्याचं चित्र सोमवारी दिसलं. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चिखली येथील गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक महाविद्यालयात कॉपीचा सुळसुळाट सुरु असल्याचं चित्र होतं. 


सर्रासपणे कॉप्या सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज फिजिक्स विषयाचा पेपर इथं सुरु होता. महाविद्यालयाच्या मागच्या बाजूनं अनेकजण परिक्षार्थींना कॉपी देत होते. विशेष म्हणजे इथं बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचारी कॉपी देणा-यांना हाकलत होते, पण तरीही कॉप्या पुरवण्याचा प्रकार सुरूच होता. कंधार तालुक्यातील इतर महाविद्यालयांमध्येही सर्रासपणे कॉप्या सुरु असल्याची माहिती आहे. 


शिक्षण विभाग काय करणार?


कॉपी मुक्तीसाठी बैठे पथक, भरारी पथक, पोलीस अशी यंत्रणा कार्यरत असतांनाही उघडपणे कॉपी केली जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय... आता शिक्षण विभाग यावर काय कारवाई करतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.