चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ : जीवावर उदार होऊन किंवा काहीवेळा पर्याय नसतो म्हणून जीवघेणे स्टंट केले जातात किंवा करावे लागतात. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मावळमध्ये ट्रॅक्टर चालकाचा जीवघेण्या प्रवासाचा व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावळ तालुक्यात साखर कारखान्यात गाळप हंगाम सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस हा मोठ्या प्रमाणात कारखान्यात येऊ लागला आहे. त्यामुळे सध्या मावळ मधील रस्त्यांवर ऊस घेऊन जाणार ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. परंतु उसाची वाहतूक चालक हे धोकादायक पद्धतीने करत असल्याचे दिसून येत आहे.



मावळ मध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. त्यात एकूण पाच तालुक्यातून ऊस पुरवठा केला जातो. त्यामुळे सध्या मावळ मधील रस्त्यांवर ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.


उसाची वाहतूक चालक हे धोकादायक पद्धतीने करत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीत जास्त ऊस कारखान्यात पोहचावा यासाठी ऊस मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरला जातो. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करताना अक्षरशः ट्रॅक्टर हा केवळ मागच्या दोन चाकावर चालत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


चालक स्वतः चा जीव धोक्यात घालून ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवत आहे. याचा व्हिडीओ समोर आलवा आहे. रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या इतर लोकांचा जीव देखील धोक्यात असल्याने या ऊस वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.