मालेगाव पालिकेत काँग्रसचा महापौर, सेनेचा उपमहापौर
मालेगाव पालिकेत काँग्रसचा महापौर आणि शिनसेनेचा उपमहापौर बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत. १४ जून रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. मात्र, शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने येथील राजकीय गणिते बदलली आहेत.
नाशिक : मालेगाव पालिकेत काँग्रसचा महापौर आणि शिनसेनेचा उपमहापौर बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत. १४ जून रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. मात्र, शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने येथील राजकीय गणिते बदलली आहेत.
मालेगाव महापालिकेत शिवसेना-काँग्रेस यांची युती झालेय. काँग्रेस तर्फे महापौर पदासाठी रशीद शेख तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे सखाराम घोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, सेना - काँग्रेस युती झाल्याने या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
काँग्रेसला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. मालेगाव महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनचा उपमहापौर होणार आहे. भाजपला सोबत न जाता सेनेन काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथे राजकीय गणित बदलले आहे.
राज्यात नुकत्याच मालेगाव, भिवंडी-निजामपूर आणि पनवेल या महापालिकांची निवडणूक झाली. २४ मे रोजी मतदान झाले तर २६ मे रोजी मतमोजणी झाली. मालेगावमध्ये काँग्रेसने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र स्पष्ट बहुमत मिळवता आले नव्हते. आता शिवसेनेने पाठिंबा दिल्याने मालेगावात काँग्रेसचा महापौर बसणार आहे.