लाडकी बहिण योजनेची पहिल्या लाभार्थी शिंदे गटाच्या भावना गवळी
Bhavna Gawli : लाडकी बहिण योजनेची पहिल्या लाभार्थी शिंदे गटाच्या भावना गवळी आहेत. भावना गवळी यांनीच तसे वक्तव्य केले आहे.
Mazi Ladki Bahin Yojana : राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरले आहेत. रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. तशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. भावना गवळी या लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत. भावना गवळी यांनीच तशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.
लाडकी बहिण योजनेची मी पहिली लाभार्थी - भावना गवळी यांचं वक्तव्य
मी पाच वेळा खासदार म्हणून निवडून आली तरी उमेदवारी दिली नव्हती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मला विधान परिषदेवर आमदार बनविले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची मी पहिली लाभार्थी आहे तसं त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना एकत्र बसवून निर्णय घ्यायचा आहे. माझ्या मनात कोणताही भेदभाव नाही. रुसवे फुगवे ठेवत नाही. माझा कोणाशी भेदभाव नाही 25 वर्ष महिला खासदार म्हणून इकडे तिकडे करत अनेकांच्या भानगडी लावल्या असत्या. दिल्लीत मोठ्या पदावर असते. मात्र मी सर्वांना कामाशी जोडत गेले.आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य भावना गवळी बोलत होत्या.
लोकसभेला भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्यांचं पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी केली जात होती. शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी भावना गवळी उमेदवारी देण्यात आली. विधान परिषद निवडणूक मध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी विजयी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी दिलेला शब्द पाळल्या बद्दल गवळी समर्थकांनी मुख्यमंत्र्याच्या आभार मानले.