प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Course) हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा (Madhya Pradesh Government) निर्णय ताजा असतानाच आता महाराष्ट्रातही (Maharashtra) मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. MBBSसह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. मात्र मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मराठीतून व्हा डॉक्टर! 


मूळ वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाहीत


वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जातील 


राज्यात MBBSचं शिक्षण देणारी 62 महाविद्यालयं


या महाविद्यालयांमधून मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाईल


इंग्रजीतील पुस्तकांचं भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तकं मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एक समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे.


मराठी माध्यमातील आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा इंग्रजीतून वैद्यकीय शिक्षण घेताना अडचणी येतात. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो,त्यामुळे स्पर्धेच्या युगात असे विद्यार्थी मागे राहण्याची भिती असते. पण आता मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेता येईल. त्याचा फायदा निश्चितपणे हजारो विद्यार्थ्यांना होईल यात शंका नाही.