सांगली : मिरज मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. 


वर्षभरापूर्वी घडला प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे हा प्रकार वर्षभरापूर्वी घडला होता. मिरज मेडिकल कॉलेजमध्ये २१ डिसेंबर २०१६ रोजी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी होस्टेलची अचानक तपासणी केली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढल्याचा आरोप आहे. 


विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर  फोटो


 हे फोटो त्यांनी अन्य डॉक्टर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.  आधार महिला संघटनेनं सांगलीच्या पोलीस अधीक्षकाकडे, या बाबत तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिले आहेत.


दरम्यान, या बाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.