पुणे : Vasant More Meeting in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होत आहे. (Raj Thackeray Sabha) मात्र, त्याआधी मोठी घडामोड घडली आहे. राज यांना नाराज वसंत मोरे यांची समजूत काढली तरी त्यांची नाराजी दूर झालेली नाही, असेच दिसून येत आहे. वसंत मोरे यांनी राज सभेआधीच रात्री मोरे बागेत बैठक घेतली. या बैठकीचा एक फोटो समोर आला आहे. त्यामुळे पुण्यात आज नक्की काय घडणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अनेक मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतली सभेपूर्वी मोरे बागेत बैठक घेतल्याने या बैठकीचीच पुण्यात जोरदार चर्चा आहे. वसंत मोरे यांच्या या बैठकीला मनसेचे अनेक पदाधिरी उपस्थित होते. वसंत मोरे यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शहर पदाधिकारी सभेच्या तयारीत असताना मोरे बैठक घेण्यात दंग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज सभेला वसंत मोरे उपस्थित असतील का, याची चर्चाही रंगत आहे.


दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होते आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान सभेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षितता त्याचप्रमाणे नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे.



आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळात राजसभा होणार आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेत आहेत. पुण्यातल्या या सभेत राज ठाकरे आज कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.