मुंबई :  मराठा क्रांती मोर्चानंतर समाजातील सर्वच समाज आपापल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरलेला धनगर समाज आता अधिक आक्रमक होणार आहे.


आंदोलनाचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनगर समाज आरक्षणा बाबत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आज बैठक बोलावलीय. धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ही माहिती दिलीय. या बैठकीत धनगर समाज आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय.


राज्यभर आंदोलन 


धनगर समाजानेही आपली मागणी लावून धरत राज्यभरात आंदोलन छेडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनात धनगर समाज बांधवांनी राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलने केली. शांततेने पार पडलेल्या या आंदोलनात बंद, चक्का जाम, ठिय्या, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर घोषणाबाजी असे आंदोलनाचे स्वरूप होते.