मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या रविवार,19 मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद, सीएसएमटी ते चुनाभट्टी, कल्याण ते कसारा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत परिणामी सर्व जलद लोकल दिवा ते परळपर्यंत धीम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यापुढे या लोकल पुन्हा परळपासून जलद मार्गावर चालवल्या जातील. तसेच रत्नागिरी दादर ते पॅसेंजर दिवा येथेच थांबवण्यात येणार आहे. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर रविवारी दिव्याहून सुटणार आहे. दादर ते दिव्यापर्यंत मध्य रेल्वेने दु. 3.40 वाजता विशेष लोकल सोडली आहे. ही लोकल ठाणे आणि दिवा स्थानकात थांबेल.


हार्बर रेल्वे : 



सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स. 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत परिणामी वाशी-बेलापूर-पनवेलहून सुटणारी सीएसएमटी आणि वडाळा रोड लोकल, सीएसएमटीहून सुटणारी वाशी-बेलापूर-पनवेल, गोरेगाव आणि बांद्रा दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला, पनवेल स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.


कल्याण ते कसारा ट्रॅफिक ब्लॉक


कल्याण ते कसारा अप- डाऊन मार्गावर सकाळी 11.25 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. परिणामी कल्याण ते कसारा अप- डाऊन वाहतूक बंद असणार असेल. तसेच मेल-एक्सप्रेसचे रद्द करण्यात आले असून काही गाड्या वळविण्यात आले आहे.
लोकल रद्द- टिटवाळा 09.12 , कसारा 08.33 , आसनगाव दु.3.30, सीएसएमटी- 10.37,10.00, 8.18, दु. 3.35, दु. 2.44


मेल- एक्सप्रेस शनिवारी आणि रविवारी रद्द : भुसावळ- सीएसएमटी- भुसावळ, (12118/12117) मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस-मनमाड,(22102/22101) मनमाड-सीएसएमटी राजरानी एक्सप्रेस- मनमाड तर नेरळ- माथेरान दरम्यान सोमवारी ते अनिश्चित काळापर्यंत दररोज सकाळी 9.45 ते दुपार 1.45 वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान 52103 नेरुळहून सुटणारी 8.50 आणि  52102 माथेरान सकाळी 9.20 ची ट्रेन रद्द करण्यात आली आहे.


पश्चिम रेल्वे :


बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 12.30 ते 4.30 वाजेपर्यंत.