Kokan Railway Megablock: मे महिन्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या आहेत. त्यामुळं गावी गेलेले चाकरमानीही शहरात परतत आहेत. कोकणातून शहरात परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे ब्लॉक सुरू आहे. त्यामुळे शेकडो रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून, रेल्वेगाड्या अवेळी धावत आहेत. तर, कोकण रेल्वेवर ३१ मे रोजी रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे


कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान ८० मिनिटे थांबा घेईल. तसेच गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान ४० मिनिटे थांबा घेईल. गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीदरम्यान २० मिनिटांचा थांबा घेईल. यासह डाऊन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेससह मुंबईकडे येणाऱ्या अप रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल.


दरम्यान, मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक 10/11 च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या साठीच 23 मे ते 31 मेपर्यंत दररोज 12.30 ते 4.30 पर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉकमुळं मुंबई-पुणे प्रगती, इंटरसिटी आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत या रेल्वे रद्द होणार आहेत. सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ३१ मेपर्यंत रद्द), पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ३१ मेपर्यंत रद्द),पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे रोजी), नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (३१ मे रोजी), साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (३१ मे)