पिंपरी : आज सर्वत्र महिला वटपौर्णिमेचा सण साजरा करत आहेत. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात. आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात. पण पिंपरी चिंचवडमध्ये सातही जन्मी हीच बायको मिळावी यासाठी काही पुरुषांनीही वटपौर्णिमेचे व्रत ठेवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडमधील मानव हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी वटपौर्णिमेचे व्रत ठेवले होते. त्यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणाही घातल्या. जर स्त्री नवऱ्यासाठी व्रत ठेवत असेल तर पुरुषांनीही बायकोसाठी व्रत ठेवायला पाहिजे अशी भूमिका मानव हक्क समितीची आहे. 


संपूर्ण महाराष्ट्रभर वटपौर्णिमा  या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महिला उपवास करतात. आपल्या पतीच्या स्वास्थासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन प्रार्थना करतात. सध्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे तसेच स्त्री-पुरुष समानतेबाबतही अधिक जागरुकता निर्माण झाल्याने पुरुषही आपल्या पत्नीसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.