नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहरात पुरुषांच्या हक्कासाठी पत्नी पीडित पुरुष संघटना आंदोलन करत आहेत. नवरा - बायको समान असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्यांच्यात भांडण झालं की चूक कोणाची का असेना शिक्षा मात्र पुरुषांना मिळते. महिलांच्या चुकीची शिक्षा पुरुषांना भोगावी लागते. त्यात कायदे देखील फक्त महिलांच्या बाजूने असल्याने पुरुषांचं म्हणणं कोणी ऐकत नाही असा आरोप पत्नी पीडित संघटनेकडून केला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी वटसावित्री पौर्णिमा असून हिंदू संस्कृतीनुसार महिला वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळो अशी मनोकामना करतात.


मात्र, पुढच्या जन्मात तरी अशी बायको देऊ नको अशी मनोकामना करण्यासाठी पत्नीपीडित पुरुष संघटनेने औरंगाबादच्या वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या. यमराजाकडे आपले मनोगत व्यक्त केले.


सरकारने पुरुषांच्या हक्कासाठी कायद्यात बदल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.