सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्याला ऐन थंडीत पावसाचा तडाखा बसणार आहे. राज्यात येत्या 48 तासात धो धो पाऊस(predicts rain in Maharashtra) पडणार आहे. हवामान खात्याने(Meteorological department) हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काळात हवामान कसे असेल याबाबत हवामान अभ्यासक डॉक्टर अनुपम कश्यापी यांनी माहिती दिली आहे. राज्यात सध्या गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर, काही भागात पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या 48 तासांत राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं. त्यामुळे पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पाऊस झाला. कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही सध्या सुरू झाला आहे.


पुढील दोन दिवस हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. प्रामुख्याने सध्या महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात जी थंडी वाढली होती.ती या वातावरणीय बदलामुळे कमी झाली आहे.येत्या 16 डिसेंबर पर्यंत राज्यात अशीच ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर पुन्हा एकदा थंडी वाढणार असल्याचं अंदाज यावेळी हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यापी यांनी व्यक्त केलं आहे.