नागपूर : वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी इथं मेट्रो कोचनिर्मिती कारखाना होणार आहे.. याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. सिंदी येथील या मेट्रो कोचनिर्मिती कारखान्यात सर्वात प्रथम पुणे मेट्रोसाठीच्या कोचेसची निर्मिती केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नागपूर मेट्रो रेल्वेसाठीच्या कोचेसची निर्मिती चीनमध्ये सुरु आहे. गेल्याच आठवड्यात आठवड्यात चीनच्या दालियन प्रकल्पातून नागपूरसाठी पहिली मेट्रो रेल्वे रवाना करण्यात आली.. मात्र पुणे मेट्रोसाठीचे कोचेसची निर्मिती आता नागपुर जवळच्या वर्धा जिल्ह्यात होणार आहेत. सिंदी रेल्वे इथं त्यासाठी कारखाना सुरु होतोय. 'मेक इन इंडिया' संकल्पनेतून या कारखान्याची निर्मिती करण्यात येणार आहे. 


वर्ध्यातील सिंदी रेल्वेस्थानकाजवळ या कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. महामेट्रो, केंद्र आणि राज्य सरकार हा प्रकल्प उभारणार आहे.. सुमारे ४०० कोटींचा हा प्रकल्प असेल. या प्रकल्पासाठी जेएनपीटीनं ५० एकर जागेची मागणी केलीये. या कारखान्यात सर्वात प्रथम पुणे मेट्रोसाठी लागणारे कोच तयार केले जातील. 


देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने मेट्रोच्या कोचेसची गरज भागवण्यासाठी नागपुरातील हा मेट्रो कोच निर्मितीचा प्रकल्प उपयुक्त ठरेल. तसंच मेट्रो कोच बनविण्याच्या कामाला गती मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आलेय.