जेव्हा 'Congratulations Chhotu' म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलेलं उत्तर; जगभर गाजला 'तो' Reply

Ratan Tata Called Chhotu He Replied: रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका तरुणीने त्यांना 'छोटू' म्हणत एक कमेंट केली होती. या कमेंटवर चक्क रतन टाटांनी रिप्लाय दिला आणि नंतर हा रिप्लाय जगभरत चर्चिला गेला. नक्की रतन टाटा काय म्हणालेले जाणून घ्या...

| Oct 10, 2024, 11:28 AM IST
1/12

tatachotucomment

रतन टाटांनी केलेल्या या रिप्लायची जगभरात झालेली चर्चा. आज त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा हे प्रकरण आणि तो रिप्लाय चर्चेत आहे नक्की घडलेलं काय ते पाहूया....

2/12

tatachotucomment

जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयामध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. मागील बऱ्याच काळापासून ते प्रकृतीसंदर्भातील समस्यांना तोंड देत होते. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. 

3/12

tatachotucomment

रतन टाटांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक भारतीयांनी तर रतन टाटांचं जाणं ही आपली वैयक्तिक नुकसान असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे.  

4/12

tatachotucomment

खरं तर रतन टाटांच्या साधेपणाचे किस्से आवर्जून सांगितले जातात. असाच एक किस्सा त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका महिलेने त्यांना 'छोटू' म्हणत कमेंट केली होती तो क्षण!  

5/12

tatachotucomment

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष असलेल्या रतन टाटांनी 30 ऑक्टोबर 2019 रोजी इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं. त्यानंतर ते वेळोवेळी या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधायचे. याच माध्यमावर 10 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडल्यानंतर स्वत:चा जमिनीवर हसत असल्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांचा आभार मानलेले. 

6/12

tatachotucomment

या पोस्टवर अनेकांनी रतन टाटांचं अभिनंदन केलं. मात्र एका महिलेने, "अभिनंदन छोटू" अशी कमेंट करत हार्टचा इमोजी पोस्ट केला होता. मात्र यावरुन या महिलेला अनेकांनी ट्रोल केलं. तिच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका झाली. तू कोणाबद्दल, काय बोलतेय कळतंय का? असा सवाल तिला अनेकांनी विचारला.

7/12

tatachotucomment

एकीकडे या महिलेवर टीकेची झोड उठत असतानाच तिला चक्क रतन टाटांनीच रिप्लाय केला होता. "आपल्या प्रत्येकामध्ये एक मूल दडलेलं असतं. कृपया, या महिलेशी सन्मानाने वागा," असं टाटांनी या महिलेच्या 'अभिनंदन छोटू' पोस्टवर कमेंट करुन म्हटलं होतं.   

8/12

tatachotucomment

यानंतर या महिलेने ही कमेंटच डिलीट केली. त्यावरही रतन टाटांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरीज पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. अशापद्धतीने तिने कमेंट डिलीट करणं टाटांना पटलं नाही. त्यांनी ती नाराजी उघडपणे व्यक्त केली.  

9/12

tatachotucomment

"एका तरुणीने फार निरागसपणे तिच्या मनातील भावना काल व्यक्त केल्या. तिने मला तिच्या कमेंटमध्ये लहान मुलं म्हटलं होतं," असं टाटांनी पहिल्या स्टोरीमध्ये म्हटलं होतं.  

10/12

tatachotucomment

"यासाठी तिचा अपमान करण्यात आला. अखेर तिने तिच्या भावना डिलीट केल्या," असं टाटा दुसऱ्या स्टोरीमध्ये म्हणाले.   

11/12

tatachotucomment

"त्या तरुणीने माझ्यासाठी सोडलेली आणि मनापासून लिहिलेली प्रतिक्रिया माझ्याबद्दलचा सन्मानाचं मी कौतुक करतो. मला अपेक्षा आहे की ती पुन्हा अशी कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखणार नाही," अशी अपेक्षा टाटांनी व्यक्त केली होती.   

12/12

tatachotucomment

या प्रसंगावरुन रतन टाटा किती साधे आणि वेगळा विचार करायचे हे दिसून येतं. त्यांच्या या भूमिकेचंही अनेकांनी स्वागत केलं होतं.