नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अनलॉक-५ जाहीर करण्यात आल्यानंतर आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे. आजपासून सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर  मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळपासून रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु राहणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोने ५० टक्के सवलत दिलीय.तसंच येत्या रविवारपासून ऑरेंज मार्गिकेवर रिच -१अंतर्गत सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान त्याच प्रमाणे प्रवासी सेवा सुरु होतेय. मेट्रो प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे. मास्क घातल्याशिवाय कुठल्याही प्रवाश्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान तपासले जाणार आहे.



प्रवाश्यांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. मास्क घातल्याशिवाय कुठल्याही प्रवाश्याला मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार नाही. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे तापमान तपासले जाईल. यात काहीही तफावत आढळल्यास स्टेशन नियंत्रक या संबंधीची माहिती आरोग्य विभागाला देईल.


प्रत्येक प्रवाश्याला सॅनिटायझर दिले जाईल आणि मेट्रो गाडीत प्रवेश करण्या आधी त्याने हात स्वच्छ करणे अपेक्षित आहे. मेट्रो गाडीत असलेल्या सर्व प्रवासी उतरल्या नंतरच नव्याने प्रवास करत असलेल्या प्रवाश्यांना डब्यात प्रवेश दिला जाईल. 


सरकारने घोषित केलेल्या अनलॉक नियमावली प्रमाण, मेट्रो प्रवासी सेवा टप्प्या-टप्प्याने सुरु करायची आहे. म्हणूनच सुरवातीला एक्वा मार्गिकेच्या अंतर्गत असलेल्या रिच-३ दरम्यान प्रवासी सेवा उद्या पासून सुरु होणार आहे. सीताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु राहणार आहे. तसेच येत्या रविवारपासून (१८ ऑक्टोबर) ऑरेंज मार्गिकेवर रिच - १ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान त्याच प्रमाणे प्रवासी सेवा सुरु होत आहे.