नागपूर : राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे इथल्या मेट्रो प्रकल्पाचं काम संथगतीनं सुरु असल्याची तक्रार असतानाच, राज्याची उपराजधानी नागपुरात मात्र पुढल्या महिन्यात मेट्रोची`ट्रायल रन होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ ऑगस्टच्या सुमाराला मेट्रो रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावर सुमारे साडे पाच किलोमीटर पट्ट्यावर पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. 


खापरी ते विमानतळ या टप्प्या दरम्यान ही ट्रायल रन होणार आहे. या साडे पाच किलोमीटरचं ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे.


या ट्रायल रनमधल्या अनुभवावरुन या प्रकल्पात अपेक्षित ते बदल केले जातील. २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.