मेट्रो स्टेशन - शिवसृष्टीच्या जागेवर अखेर निर्णय
कोथरुड कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी उभारायची? याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
पुणे : कोथरुड कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी उभारायची? याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत कचरा डेपोच्या ठिकाणी मेट्रो स्टेशन तर शिवसृष्टी चांदणी चौकात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोथरुड परिसरातील नगरसेवक विशेष करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक याठिकाणी शिवसृष्टीच व्हावी अथवा मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी असे दोन्हीही व्हावे या मागणीसाठी आग्रही होते.
अशा परिस्थितीत हा विषय आता मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत अखेर या वादावर तोडगा निघालाय.