Mhada Lottery 2023 : बातमी म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार 20 टक्के योजना, पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहप्रकल्पातील घरांसाठीची अनामत रक्कम दुप्पट केली आहे. (Mumbai News) तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.  ( Mhada Lottery News in Marathi) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. लवकरच तो म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कोकण मंडळातील घरांसाठी ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरारमधील घरांसाठी अर्ज करणं इच्छुकांना आर्थिकदृष्टया अडचणीचं ठरणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या जाहिरात प्रसिद्धी प्रक्रियेचं काम अंतिम टप्प्यात आहे. 



कोकण मंडळाच्या निर्णयामुळे आता अत्यल्प गटासाठी 10 हजार रुपये, अल्प गटासाठी 20 हजार रुपये, मध्यम गटासाठी  30 हजार रुपये, तर उच्च गटासाठी 40 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबत नवा अनामत रक्कम प्रस्ताव तयार केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या सोडतीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील दोन हजारांहून अधिक घरांचा समावेश आहे. या सोडतीसाठी घराच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून आकारली जाण्याची शक्यता आहे.


4 हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात लवकरच


कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे, नवी मुंबई येथे ही मोक्याच्या ठिकाणी घरे आहेत. सुमारे चार हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील घरांच्या किंमती या 15 ते 44 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. दरम्यान,  पुणे मंडळाच्या 5 हजार 990 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री आणि  अर्ज स्विकृती सुरु झाली आहे.  या लॉटरीत 1 हजार 250 घरं पंतप्रधान आवास योजनेतील असणार आहेत. 


कुलाबा  येथे 10 हजार घरांची लॉटरी 


मुंबईत घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. साऊथ मुंबईत (south mumbai) घर खरेदीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. म्हाडा कुलाबा येथे घरांची सोडत काढणार आहे. कुलाबा ( Colaba Mumbai) येथे म्हाडा दहा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. म्हाडाच्या गृह प्रकल्पासाठी कुलाबा परिसरात चार एकर जागा आता उपलब्ध होणार आहे. म्हाडा संक्रमण शिबीर भूखंडाचा विकास केला जाणार आहे.  मोडकळीस आलेले इमारतील लोकांना 40 वर्षांनंतर हक्काचे घर मिळणार आहे. चार एकर जागेवर म्हाडा सदनिका बांधू शकले 10 लाख चौरसफूट बांधकाम होऊ शकते. या प्रकल्पाअंतर्गत दहा हजार सदनिका कुलाबा सारख्या भागात उपलब्ध होऊ शकतात असं राहुल नार्वेकर म्हणाले.