Mhada Lottery 2023: मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाने अलीकडेच मुंबई मंडाळासाठी ४ हजार घरांची सोडत जाहीर केली आहे. त्याचबरोबर कोकण बोर्डासाठी ऑक्टोबरमध्ये  लॉटरी काढण्याची तयारी म्हाडा करत आहे. मात्र, आता पुन्हा मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी नागरिकांना दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत गोरेगावमध्ये म्हाडाच्या काही इमारती तयार होत आहेत. यात मध्यम वर्गासाठी 227 घरे तर उच्च वर्गासाठी 105 घरे तयार होत आहेत. त्याचबरोबर अन्य प्रोजेक्टमध्येही म्हाडाला काही घरे प्राप्त होणार आहेत. गोरेगावमध्ये होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये घरे तयार होण्यास अद्याप दीड ते दोन वर्षांचा वेळ लागणार आहे. 


मागील आठवड्यात मुंबई बोर्डासाठी 4,082 घरांसाठी 1,45,849 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र 4 हजार जणांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळं आगामी मुंबई मंडळाच्या लॉटरीत म्हाडा अधिक घरे देणार असल्याची शक्यता आहे. मुंबईकरांना स्वस्त दरात घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाला पहाडी गोरेगाव, बांगुर नगर आणि गोरेगाव पश्चिम येथे सरकारने 25 एकर जमीन दिली आहे. यातील 18 एकर जमीनीवरील बांधकाम केले जाणार आहे. म्हाडा या 18 एकर जमिनीवर 5 हजार घरांचे बांधकाम करत आहे. यातील 5 हजार घरांपैकी म्हाडा आत्तापर्यंत फक्त 2 हजार घरे पूर्ण झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच जारी झालेल्या सोडतीत या घरांचा समावेश करण्यात आला आहे. लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाला संपूर्ण 25 एकर जमिनीवर बांधकाम करण्याची गरज आहे. 


एकीकडे मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्जांची संख्या अधिक आहे. मुंबई मंडळाच्या एका घरासाठी 29 जणांनी अर्ज दाखल केला होता. मुंबईबाहेरील घरांसाठी म्हाडाला ग्राहक मिळत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी जाहिर झालेल्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये पाहायला मिळाले. इथे विरारमध्ये जवळपास 1600 घरांची विक्री करणे म्हाडासाठी अवघड जात आहे. त्यासाठी ऑक्टोबरमध्ये काढण्यात येणाऱ्या कोकण मंडळाच्या सोडतीत पुन्हा या घराचा समावेश करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये जारी होणाऱ्या 4500 घरांसाठी लॉटरीमध्ये जवळपास 1600 घर विरारमधील आहे.