Mhada Lottery 2024: सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात म्हाडाकडून घरे उपलब्ध होतात. मुंबईत घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं अनेक मुंबईकर म्हाडावर अवलंबून असतात. मोक्याच्या ठिकाणी आणि स्वस्त दरात घरं उपलब्ध करुन देतात. मागील वर्षी म्हाडाने चार हजार घरांची लॉटरी काढली होती. तर, यावर्षीही म्हाडा मुंबईत दोन हजार घरांची लॉटरी काढणार आहे. मुंबईबरोबरच आता कोकण मंडळासाठीही म्हाडाने लॉटरीची तयारी केल्याची माहिती समोर येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण महामंडळाकडून लॉटरीची तयारी करण्यात येत आहे. सध्या कोकण मंडळाकडे दोन हजार घरे उपलब्ध आहेत. पण लवकरच यामध्ये आणखी घरांची वाढ होऊ शकते. विधानसभा निवडणुकांपूर्वीच लॉटरी काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे लक्ष आता म्हाडाच्या लॉटरीकडे लागून राहिले आहेत. तसंच, लवकरच मुंबई मंडळाचीही लॉटरी जाहीर होणार आहे. 


लॉटरीसंदर्भात कोकण मंडळाकडून लवकरच बैठक घेतली जाणार आहे. सध्या कोकण मंडळाकडे 2 हजार घरे आहेत. यात आणखी घरांची वाढ होऊ शकते. तसंच, कोकण मंडळाबरोबरच मुंबई मंडळ आणि पुणे मंडळाकडूनही लॉटरी काढण्यात येऊ शकते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी लॉटरी काढण्याचा प्रयत्न मंडळाकडून सुरू आहे. 


3 हजार घरांचा समावेश 


कोकण मंडळाकडे आता 2 हजार घरे आहेत. मात्र आणखी घरांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळं 3 हजार घरांपर्यंतच्या घरांसाठी लॉटरी जाहिर होऊ शकते. यात 900 घरे पंतप्रधान आवास योजनेतील असून इतर घरे म्हाडा योजनेतील आहेत. तसंच, यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विक्री न झालेल्या 4 हजारांहून अधिक घरांचा यामध्ये समावेश आहे. 


मुंबई मंडळाचीही लॉटरी 


मुंबई महामंडळातर्फे काही दिवसांतच लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हाडा गोरेगाव, पवई, विक्रोळी इत्यादी ठिकाणांच्या घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करणार आहे. या घरांच्या किंमती 34 लाखांपासून सुरू होणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसंच, अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.